मुक्ताईनगर मतदारसंघातील सिंचन योजनांना मिळणार गती

मुक्ताईनगर प्रतिनिधी | मतदारसंघातील सिंचन योजनांच्या कामांना गती मिळावी ही मागणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली होती. यानुसार आज आढावा बैठक घेण्यात आली. यात योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दि 12 ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांचेकडे  मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती.

त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मंत्रालय येथील दालनात आज दि 20 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, ता ना मुंडे सचिव जलसंपदा विभाग, विजय गौतम विशेष कार्य अधिकारी जलसंपदा मंत्री, अ प्र कोहीकर सचिव, डी डी तवार कार्यकारी संचालक तापी महामंडळ, वाय एम कडलग कार्यकारी अभियंता तापी महामंडळ,निवृत्ती पाटील सभापती बोदवड बाजार समिती,सुभाष पाटील माजी जि प सदस्य,रामभाऊ पाटील माफदा मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष ,विशाल महाराज खोले जिल्हा संयोजक प्रवक्ता सेल जळगाव जिल्हा, रविंद्र पाटील उपसरपंच हिवरा हे उपस्थित होते. तर जळगाव येथुन व्हिडीओ कॉन्फरस द्वारे प्रशांत मोरे अधीक्षक अभियंता ,गोकुळ महाजन कार्यकारी अभियंता, अदिती कुलकर्णी कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते.

पूर्णा तापी नदीचे पुराद्वारे वाहून जाणारे पाणी लिफ्ट इरगेश द्वारे उपसुन  मुक्ताईनगर बोदवड कुऱ्हा परिसरातील शेतीला देऊन  शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायती खाली येण्यासाठी एकनाथ खडसे हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी  मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात तापी खोरे विकास  महामंडळाअंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनाची मुहूर्तमेढ रोवली  या योजनांचे काम सुरु आहे.

या उपसा सिंचन योजनांच्या  आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा आज जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी घेतला.  यावेळी मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले असुन उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या 55 कोटी रुपये निधीचा सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंजुरी साठी शासनाकडे गेलेला आहे त्यावर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे सांगितले. मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर असलेल्या कुंड धरणाचे काम पूर्ण झाले आहे परंतु धरणाच्या भिंतीची उंची वाढविणे व सांडव्याचे काही काम अपूर्ण राहिले आहे. यावर  धरणाच्या भिंतीची  3 मीटर ने उंची वाढविणे व सांडव्याचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 19 कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल असे जलसंपदा मंत्री  जयंतराव पाटील यांनी सांगितले. वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम जवळपास पुर्ण झाले आहे त्याद्वारे हतनुरचे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्यात येते परंतु हि योजना  काही तांत्रिक अडचणीमुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे योजनेच्या विद्युत पुरवठा व पाणी उपसा करणारे पंपामध्ये बिघाड निर्माण झाला आहे.

त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना  पावसाळ्यापूर्वी  दरवर्षी योजनेची तांत्रिक चाचणी घेण्यात यावी असे सक्त निर्देश दिले व आता लवकरात लवकर विद्युत पुरवठ्याचे व पंपाचे काम करून ओझरखेडा तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले. तसेच या योजनेचे अपूर्ण असलेले पाणी  वितरिकेचे काम करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल. व वितरिकेच्या कामांची निविदा काढण्यात येईल असे सांगितले. बोदवड परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला  बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाच्या मार्फत 500 कोटी मंजूर झाले आहेत. यातील  60 कोटी रुपये निधी मिळाला असुन उर्वरित 433 कोटी रुपये निधी मिळण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिले.  कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन  योजनेचे अपुर्ण असलेल्या कामासाठी  सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल सादर करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाला निर्देश दिले.

 

Protected Content