आघाडीमध्ये बिघाडी; उद्धवसेनेचे डॉ. बी.डी. चव्हाण वंचितमध्ये

हिंगोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेनेशी सर्वाधिक जवळीक असलेल्या वंचित बहुजन आघाडीने उद्धवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना स्वत:कडे दाखल करून घेतले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि हिंगोली लोकसभा संघटक डॉ. बी. डी. चव्हाणांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या यशवंत भवन या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला. या नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचे चव्हाणांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हिंगोली लोकसभा मतदार संघावर वंचित बहुजन आघाडी दावा सांगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. बी. डी. चव्हाण राज्य सरकारच्या वसंतराव नाईक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यांनी राजकीय कारकीर्द भारिप बहुजन महासंघातून सुरू केली होती. त्यामुळे एका अर्थाने त्यांची घरवापसी झाली आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यातील उद्धवसेनेचे मूर्तिजापूर तालुकाप्रमुख संगीत कांबे यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी गायत्री या गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य आहेत.

Protected Content