भडगावच्या तलाठी कार्यालयाचे स्थलांतर नको, नूतनीकरण करण्याची मागणी

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव शहर तलाठी कार्यालय स्थलंतरित न करता जुन्या स्थानी च नुतूनीकरण करून नागरिकांना सोयीचे करावे असे निवेदन शहरतील नागरिकांच्या वतीने तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्टात आले आहे की, भडगाव शहर तलाठी कार्यालय हे पुर्वी पासुन गावातच होते परंतु ते जीर्ण झाल्यामुळे भडगाव तहसील कार्यालय (बस स्टँड जवळ) येथे तात्पुरता हलविण्यात आलेले होते. परंतु आत्ता जे नवीन तलाठी कार्यालय मंजुरी मिळालेली आहे ते मागील काळात राहिलेल्या तहसीलदार तृप्ती धोडपीसे यांच्या कार्यकाळात नवीन तलाठी कार्यालय मंजुरी व बांधकाम मंजूर केलेले आहे. परंतु हे गावाबाहेर होणार असल्याने गावकरी जनतेला ते लांबणीचे होणार आहे. यामुळे सुमारे दोन किलोमीटरचे वाढीव अंतर लागणार आहे.

यामुळे  ज्या गोरगरीब माता भगिनी, सर्व सामान्य शेतकरी जनतेकडे वाहन नसेल त्यांना तो लांबचा पल्ला घाटने शक्य नाही व परत जेष्ठ लोकांनी उत्पन्नाचा दाखला असो किंवा अजून त्यांचे कोणतेही शासकीय पगाराचे काम असो त्यांनी इतक्या लांब कसे यायचे जायचे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण जे वाक रस्त्याला १/२ किलोमीटर वर मंजूर केलेले तलाठी कार्यालय आहे ते नामंजूर करून जुन्या गावातील बाजार पेठ येथेच ते तलाठी कार्यालय मंजुर करावे व नवीन बांधकाम करावे, अन्यथा आंम्ही आपण मंजूर केलेल्या जागेत तलाठी कार्यालय बांधकाम होऊ देणार नाही असे या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर शहरातील ४०० ते ५०० नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

Protected Content