कॉंग्रेसतर्फे विधान सभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 07 29 at 3.27.02 PM

जळगाव , प्रतिनिधी | कॉंग्रेसतर्फ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज (दि. २९ जुलै) रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव तसेच ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे, जिल्हा निवड मंडळचे  यांनी सकाळी ११ वाजता भुसावळ तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत घेऊन सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी  जिल्हा निवड मंडळ सदस्य जळगाव महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, डी. जी. पाटील, ललिता पाटील, उदय पाटील, देवेंद्र मराठे, भगतसिंग पाटील, जमील शेख, योगेश महाजन, निळकंठ फालक, ज्ञानेश्वर कोळी आदी उपस्थित होते.कॉंग्रेसचे भुसावळ विधानसभेचे प्रमुख दावेदार संजय ब्राह्मणे यांच्यासह रवींद्र निकम यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

उमेदवारी मिळाल्यास कॉंग्रेस पक्षाचा झेंडा उंचीवर नेणार : संजय ब्राह्मणे
संजय ब्राह्मणे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलताना सांगतिले की, भुसावळ तालुक्यातील रखडलेला विकास, बेरोजगारी, भुसावळ शहर हे भाजपाने बकाल करून सोडले आहे. भुसावळ शहराचा विकास करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली तर कार्यकर्त्यांच्या साथीने यश मिळवून कॉंग्रेस पक्षाचा झेंडा उंचीवर नेऊन ठेऊ असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, जळगाव शहर दुपारी १२ वाजता, जामनेर दुपारी १२.३० वाजता, चोपडा दुपारी १ वाजता तर एरंडोल तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत दुपारी १.३० वाजता होणार आहे. तसेच चाळीसगाव तालुका दुपारी २ वाजता, जळगांव ग्रामीण दुपारी ३ वाजता व पाचोरा-भडगाव तालुका ३.३० वाजता मुलाखती घेण्यात आल्यात. यासोबतच दुपारी ४ वाजता रावेर, मुक्ताईनगर सायंकाळी ४.३० वाजता तर सर्वात शेवटी अमळनेर तालुक्यातील इच्छुकांची मुलाखत सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे.

Protected Content