Home Cities जळगाव जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी राऊत यांची उद्या मुलाखत

जळगाव आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी राऊत यांची उद्या मुलाखत

0
24

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात येत असून उद्या दि. ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७:४० वाजता जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

31 जानेवारी रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमही  जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या मुलाखतीत कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्याचबरोबर कोरोनाची लस आलेली असली तरी, नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना घ्यावयाची काळजी, कोरोना काळात स्वयंशिस्तीला असलेले महत्व, पल्स पोलीस लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटीतील 3 लाख 72 हजार बालकांना 2654 बुथवर करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने केलेली तयारी आदिंबाबतची माहिती आपल्या मुलाखतीत दिली आहे.   ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे.  तरी जिल्हावासियांनी  ही मुलाखत शनिवार, 30 जानेवारी, 2021 रोजी सकाळी ठिक 7.40 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकावी. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.


Protected Content

Play sound