धानोरा शिवारातील शेतातील केळीच्या झाडे कापून फेकली; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानोरा बुद्रुक शिवारातील शेतात अज्ञात व्यक्तीने केळीच्या झाडांची कापूर ७ हजार रूपयांचे नुकसान केल्याचे गुरूवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

अधिक माहिती अशी की, राजेंद्र महारू सोनवणे (वय-६५) रा. धानोरा बुद्रुक ता.जि.जळगाव यांचे धानोरा बुद्रुक शिवारातील गट नंबर २७ मध्ये दोन एकर शेत आहे. २७ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने शेतातील ७ हजार रूपये किंमतीचे केळीच्या पानांचे खोड सुमारे २०० ते २५० झाडे कापून नुकासान केल्याचे उघडकीला आले आहे. हे नुकसान पुर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी राजेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे.

 

Protected Content