सहयोग हॉस्पिटलची तोडफोड करणार्‍या चौघांची कारागृहात रवानगी

जळगाव प्रतिनिधी । अपघातात जखमी झालेल्या रुग्ण उपचारादरम्यान दगावल्यामुळे नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना २७ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी चार संशयियत आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

पारोळा तालुक्यातील विटनेर येथील विनोद भिराव वानखेडे यांचा बुधवारी धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा गावाजवळ अपघात झाला होता. त्यांना उपचाराासाठी शहरातील सहयोग क्रिटीकल केअर रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यांना याठिकाणी आणले असता त्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सहयोग क्रिटीकल हॉस्पिटलची तोडफोड करीत डॉ. विनोद किनगे यांना देखील मारहाण करण्याचा  प्रयत्न केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चौघांना शहर पोलिसांनी केली अटक

हॉस्पिटलची तोडफोड करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी प्रवीण बाबू सपकाळे, रोहन रविंद्र सपकाळे, रत्नाकर संजय सपकाळे, शिवराज मारोती देवदान सर्व रा. पाडा क्र ३ परेश नगर लोकमान्य नगर ठाणे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Protected Content