Home क्रीडा भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

0
15


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कृष्णचंद्र हॉल जवळील मोकळ्या जागेत सकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या योग सत्रात संस्थेच्या ५० हून अधिक सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

प्रसिद्ध योग प्रशिक्षिका योगमास्टर पूनम कुलकर्णी यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यान यांचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. सत्राची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर प्राणायाम आणि विविध योगासनांचा सराव सहभागी सदस्यांकडून करून घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या छोटू गवळी, स्वाती भोळे, पंकज कुलकर्णी यांसह सर्व सदस्यांचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी डॉ चारुलता पाटील, स्वाती फालक, गणसिंग पाटील, प्रविण वारके आदी सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक छायाचित्र घेण्यात आले. उपस्थित सर्वांनी योगमास्टर पूनम कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे तसेच योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे मनापासून कौतुक केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.


Protected Content

Play sound