Home Cities जळगाव जि. प. शाळा मोहाडी येथे जागतिक योग दिन उत्साहात !

जि. प. शाळा मोहाडी येथे जागतिक योग दिन उत्साहात !

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहाडी येथे जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी एकत्र येत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेत सक्रिय सहभाग घेतला.

या प्रसंगी उपशिक्षिका कविता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवत त्यांच्याकडून नियमित सराव करून घेतला. तसेच योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगताना त्यांनी योगामुळे शरीर निरोगी राहते, मन एकाग्र होते आणि मानसिक तणाव कमी होतो असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने करून कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्राणायाम, सूर्यनमस्कार तसेच सोप्या योगासनांचे प्रशिक्षण देण्यात आले. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. संपूर्ण वातावरणात उत्साह, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. या कार्यक्रमास शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गणेश बागुल, भारती शिंपी, टीना सोनवणे, उपशिक्षिका कविता चव्हाण तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


Protected Content

Play sound