रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रम शाळा लालमाती येथे आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. या उपक्रमात नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा कल्याण अधिकारी श्री. नरेंद्र डागर, प्रा. प्रणाली पावशे मॅडम, अजिंक्य गवळी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील आदिवासी नागरिक, सरपंच, ग्रामसेवक व आशा वर्कर यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मनेष तडवी, सरपंच श्री. सुलेमान तडवी, ग्रामसेवक राजेंद्र तडवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कलिंदर तडवी, पोलीस पाटील राजू तडवी, उपसरपंच करीम तडवी, आशा वर्कर शबाना तडवी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शाळेतील शिक्षक के. पी. ठाकरे, आर. एस. पाटील, सचिन शिंदे, प्रशांत सैंदाणे, राजू बारेला, आशिष पाटील, पाचपांडे सर, कुर्बान सर, असलम तडवी सर, प्रकाश चव्हाण, लखन महाजन सर आणि परिसरातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या संधींबाबत माहिती मिळाली आणि गावातील समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.