अश्लील चाळे करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला पाणी मागण्याचा बहाणा करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री 9 वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता पीडित मुलगी ही घरी असताना किचनमध्ये काम करणारा पेंटर सतीश भीमराव बिऱ्हाडे रा. भुसावळ यांनी पाणी मागण्याचा बहाणा करून पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. दरम्यान पीडित मुलीच्या आईने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सतीश भीमराव बिऱ्हाडे रा. भुसावळ याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे हे करीत आहेत.

Protected Content