धनाजी नाना महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभाग च्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेत धावणे, उड्या मारणे आणि फेकणे यानांच्या स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे विशेष आकर्षण १०० मीटर धावणे, २१ कि. मी. धावणे व लांब उडी मारणे यासारख्या स्पर्धा ठरल्या. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत २४ पुरुष व २१ महिला संघानी सहभाग घेतला होता.  मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. डॉ. एस. के. चौधरी तर उद्घाटक म्हणून युवा नेते धनंजयभाऊ शिरीषदादा चौधरी हे होते.

प्रमुख उपस्थित तापी परिसर विद्यामंडळ संस्थेचे उपाध्यक्ष  मिलिंद वाघुळदे,  लिलाधर चौधरी – चेअरमन, एन. ए. भंगाळे – सहसचिव, डॉ. एस. एस. पाटील – सदस्य, ओंकार सराफ – सदस्य, तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. जगदीश पाटील, अधिसभा सदस्य प्रा. पी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, अध्यक्ष जळगाव विभाग क्रीडा समिती, प्राचार्य डॉ. किशोर पाठक, प्राचार्य डॉ. लभाने सर, प्र. प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सदस्य, प्रा. गोविंद मारतळे सचिव जळगाव विभाग क्रीडा समिती, प्रा. डॉ. संजय चौधरी सहसचिव जळगाव विभाग क्रीडा समिती, प्रा. डॉ. मुकेश पवार सहसचिव जळगाव विभाग क्रीडा समिती व इतर प्राध्यापक व शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमात उदघाटक युवानेते  धनंजय भाऊ चौधरी यांनी मैदानी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे वाढणारे महत्व आणि युवकांनी करावयाची तयारी या विषयी मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय समारोप करतांना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी यांनी संस्थेच्या स्थापने विषयी माहिती सांगितली आणि तरुणांनी या पावन व पवित्र ठाकणापासून ऊर्जा घेऊन आपली कारकीर्द यशस्वी करून स्वतःचे व देशाचे नाव उज्वल करावे असे अहवाहन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे सर यांनी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष व रावेर यावल परिसराचे लाडके लोकनेते आदरणीय आमदार शिरीषदादा यांचा शुभेच्छा संदेश सांगितला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रध्येय लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

स्पर्धेचा १०० मीटर धावणे यात पगारे यश – प्रथम रावेर महाविद्यालय, गौरव विंचूरकर – द्वितीय, मोहसीन तडवी – तृतीय दोन्ही खेळाडू धनाजी नाना महाविद्यालयाचे तसेच लांबउडीत सुद्धा बारेला जगदीश – प्रथम मु. जे. महाविद्यालय तर मोहसीन तडवी द्वितीय धनाजी नाना महाविद्यालय यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.उद्घाटन कार्यकमात सहभागी सर्व महाविद्यालयातील खेळाडूंनी सर्व मान्यवरांना मानवंदना दिली त्यानंतर जळगाव विभागाचा व महाविद्यालयाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्या नंतर खेळाडूंनी शपथ घेतली त्या नंतर प्रा. गोविंद मारतळे यांनी प्रास्ताविक केले व कर्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सीमा बारी मॅडम आणि आभार प्रदर्शन प्रा. दिलीप बोदडे यांनी केले.

Protected Content