भुसावळ-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील श्रीनगर अष्टविनायक कॉलनी आयोध्या नगर सह इतर भागात विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेऊन एका संताप व्यक्त केला इलेक्ट्रिक डीपी बसवा अन्यथा उपोषण करू असा इशारा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून श्री नगर, अष्टविनायक कॉलनी,अयोध्या नगर, मोहित नगर, हुडको कॉलनी या भागात विद्युत प्रवाह रोज रात्री खंडित होत असतो, तर कधी कधी कमी दाबाने वीजपुरवठा होत असतो आणि त्या मुळे ह्या भागातील रहिवासी त्रस्त झालेले आहे, कमी जास्त दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे अनेक वेळा घरातील विद्युत उपकरणे सुद्धा खराब होत असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने घरात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना घरात राहाणे मुश्किल झाले आहे. तरी आपण लवकरात लवकर या भागामध्ये नवीन डिपी बसवावी व भुसावळ शहरात ४ ठिकाणी नवीन सब स्टेशन करावे अन्यथा येत्या ५ तारखेला आपल्या कर्यालासमोर उपोषण करण्यात येईल
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,नरेंद्र लोखंडे, पिंटू भोई, छोटू पाटील, विशाल ठोके,गणेश लोखंडे,लव झादागे,भूषण रोझतकर, जितू पाटील उपस्थित होते.
इलेक्ट्रिक डीपी बसवा अन्यथा उपोषण; ग्रामस्थांचे महावितरणाला इशारा
7 months ago
No Comments