अमळनेर मध्ये सुरू होणार प्रकाश पाटील यांचे संपर्क कार्यालय

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| झाडी येथील मुळ रहिवासी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजरात एटीएसमधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर. पाटील यांच्या अमळनेर येथील जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा केंद्रिय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प. पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभहस्ते दिनांक २७ मे रोजी सकाळी संपन्न होत आहे.

प्रकाशभाई पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर अमळनेर तालुक्यात विविध लोकउपयोगी कामे करण्यासाठी आपले उर्वरित आयुष्य हे लोकसेवेसाठी सार्थकी लावण्याचे ठरविले आहे. त्यासाठी रुग्णांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका व विविध बेरोजगार हातांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. जनतेचा संपर्क व्हावा यासाठी त्यांनी जनसंपर्क कार्यालय सुरु करण्याचे नियोजित केले आहे. जनतेच्या सेवेसाठी २४ तास त्यांचा प्रयत्न अखंडीत सुरु राहणार आहे.

असा होईल उद्घाटन सोहळा –

सकाळी ७.३० वाजता झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिरावर केंद्रिय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प.पू. महामंडलेश्वर अखिलेश्वरदास महाराज यांचे आगमन व होमहवन कार्यक्रम, हॉटेल मिडटाऊन येथून सकाळी १०.०० वाजेपासुन बग्गीवर केंद्रिय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प.पू. महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांचा मिरवणुक कार्यक्रम, ही मिरवणुक हॉटेल मिडटाऊन हॉटेल – सुभाषचौक स्टेशनरोडकडून तहसिल कार्यालयाकडे मार्गस्थ होईल व महाराणा प्रताप चौकात आगमन, त्यानंतर धुळे रस्त्यावरील शिवांश बिझनेस हब येथे कार्यालय स्थळी आगमन, त्यानंतर १०.४८ वा. जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन केंद्रिय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प.पू. महामंडलेश्वर अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचेदेखील लोकार्पण महाराजांच्या हस्ते होणार आहे. यासाठी तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी अगत्याने येण्याचे आव्हान प्रकाशभाई आर. पाटील यांनी केले आहे.

Protected Content