दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बंधार्‍यात बुडून मृत्यू

शेअर करा !

अमळनेर प्रतिनिधी । बंधार्‍यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बंधार्‍यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना तालुक्यातील लोंढवे येथे घडली आहे.

adv final
WhatsApp Image 2020 08 11 at 2.57

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील लोंढवे येथील रहिवासी असणारे हितेश सुनील पवार आणि भावेश बळीराम देसले हे दोन शाळकरी विद्यार्थी गावापासून जवळ असणार्‍या बंधार्‍यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र खोल पाण्यात पोहता न आल्यामुळे ते बुडाले.दरम्यान, त्यांच्यासोबत असणारा तिसरा विद्यार्थी मात्र पाण्यात न उतरल्यामुळे बचावला. त्याने गावात जाऊन ही माहिती दिल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने बंधार्‍याकडे धाव घेतली. तथापि, तोवर दोघांचा मृत्यू झाला होता. हितेश व भावेश हे दोन्ही दहावीचे विद्यार्थी असून एकमेकांचे जीवलग मित्र होते. त्यांच्या मृत्यूमुळे लोंढवे गावावर शोककळा पसरली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!