चोपडा महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात

chopada news

चोपडा प्रतिनिधी । येथील म.गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करण्यात आले. कु दिपिका नेवे हिने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल व पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय.पाटील यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्रा.बी.एस हळपे म्हणाले की, बालपणापासून वृध्दावस्थापर्यंत वाचन हा मनोरंजनाबरोबर ज्ञानार्जनाचा मार्ग असून संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचा उपाय आहे. प्रास्तविक प्रा.एन.बी.शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिपाली पाटील व आभार प्रदर्शन प्रा.राजश्री निकम यांनी केले. प्रा.शिरिन सैय्यद, प्रा.व्ही.आर मराठे आदिंसह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content