लिंबू विक्रेत्याच्या दोन्ही मुली दहावीत पहिल्या !

mali sisters amalner

अमळनेर ईश्‍वर महाजन । तालुक्यातील देवगाव देवळी येथील लिंबू विक्रेते ज्ञानेश्‍वर माळी यांच्या दोन्ही मुलींनी शाळेत पहिला क्रमांक पटकावण्याचा अनोखा बहुमान पटकावला असून याचे परिसरातून कौतुक होत आहे.

याबाबत वृत्त असे की, देवगाव देवळी येथील ज्ञानेश्‍वर माळी हे अमळनेरच्या बाजारात लिंबू विक्रीचे काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नीसह दोन मुली, एक मुलगा यांचा समावेश आहे. त्यांच्या निकीता, अश्‍विनी या दोन्ही मुली तसेच मुलगा भावेश हे सर्व हुशार आहेत. त्यातही दोन्ही मुली हुषार..शांत,समजस,नम्रता, हुषार,हे गुण अंगी होते. शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड. शाळेत स्पर्धा कोणतीही असो, त्यात अगोदर सहभाग .. हमखास बक्षीस ..असे जणू समिकरण झाले होते. या दोन्ही भगिनी देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये विविध स्पर्धामध्ये अव्वल असायच्या. त्यांनी अनेक बक्षीसे पटकावले आहेत. त्यांची मोठी मुलगी निकिता ज्ञानेश्‍वर माळी मार्च २०१८च्या परीक्षेत ८६:८० गुण मिळवून शाळेत प्रथम आली. तर अश्‍विनी माळी हिला वाटायचं कि आपलाही दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आला पाहिजे, यासाठी ती नियमित अभ्यास करू लागली. व मेहनतीला अखेर यश मिळाले. यावर्षी मार्च२०१९ च्या दहावीच्या परीक्षेत ८४:४० गुण संपादन करून ती प्रथम आली आहे.

या उज्ज्वल यशाबाबत निकीता व अश्‍विनी यांच्याशी वार्तालाप केला असता त्या म्हणाल्या बारावी विज्ञान विषयात चांगला अभ्यास करून निकीताला नेव्हीमध्ये जाण्याचा मानस आहे. तर अश्‍विनी माळी विज्ञान विषयात पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असे सांगितले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम जरी असली माझे आई वडील नेहमी म्हणतात, बेटा तुमची इच्छा आहे तोपर्यंत शिका असे सांगून आतापर्यंत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते बारा वर्षांपासून अमळनेरला लिलावातून लिंबू घेऊन तेच दिवसभर विकतात. ते मेहनत करून आमचे कुटुंब चालवत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे या दोन्ही बहिणींनी सांगितले. निकीता, व अश्‍वीनी माळी सारख्या मुली आजच्या तमाम मुलींना प्रेरणादायी आहेत. त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

dyaneshvar mali amalner

लिंबू विक्रेते ज्ञानेश्‍वर माळी

Add Comment

Protected Content