बाजार समितीच्या संकुल प्रकरणात विकसकाला भिंत बांधून देण्याचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन व्यापारी संकुल प्रकरणात नवीन टर्न आला असून आता विकसकाने संबंधीत भिंत बांधून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बाजार समितीने या प्रकरणी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी रात्री उशीर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी संकुलाच्या प्रकरणाबाबत महत्वाची घोषणा केली. याप्रसंगी बाजर समितीचे सभापती कैलास चौधरी यांच्यासह संचालक प्रभाकर पवार, वसंतराव भालेराव, सुनील महाजन, सुरेश पाटील, माहेर पाटील, प्रवीण भंगाळे, व्यापारी प्रतिनिधी संचालक नितीन बेहेडे, शशी बियाणी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रभाकर पवार म्हणाले की, पालिका उपायुक्तांनी विकासकाचा बांधकाम प्रस्ताव नाकारण्याची नोटीस शुक्रवारी संध्याकाळीच काढली होती. मात्र दोन दिवस सुट्टी असल्याने ती सोमवारी प्राप्त झाली. तर विकासकाने शनिवारी पहाटेच संरक्षण भिंत तोडली. यामुळे विकासकाने कायद्याच्या चौकटीत राहूनच बांधकाम करणे संचालक मंडळाला अपेक्षित असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव नसल्याचेही संचालकांनी सांगितले. आडत असोसिएशनने या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला होता. यावर संबंधीतांनी याला सिध्द करण्याचे प्रति-आव्हान दिले.

Add Comment

Protected Content