तरूणाच्या मृत्यूची चौकशी करा; कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेल्या तरुणाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असून यांची चौकशी करावी या मागणीसाठी कुटुंबीयांनी आज बुधवार २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, शंकर मधुकर निकम वय 32 रा. सुरेशदादा जैन नगर, गेंदालाल मिल हा तरुण १५ दिवसांपूर्वी आजारी पडून उलट्या होऊ लागल्याने  त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या उपचारांमुळे शंकर निकम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची तक्रार मयत निकम यांची आई सुमनबाई मधुकर निकम व पत्नी रेखा शंकर निकम यांनी १२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांना चौकशी संदर्भात निवेदन देण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत निवेदनाची दखल न घेतल्यामुळे मयत शंकर निकम यांच्या मृत्यूची चौकशी होऊन संबंधित डॉक्टर व परिचारिका यांच्यावर कायदेशीर कारवाई करून करून गुन्हा दाखल करण्यात यावा व कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा या मागणीसाठी आई सुमन निकम व पत्नी रेखा निकम यांनी आज बुधवार 20 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील अशी माहिती सुमनबाई निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Protected Content