पाचोऱ्यात इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस काळे झेंड दाखवून निदर्शने (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी । राज्यात पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसची मोठी दरवाढ झाल्याने मोदी सरकारविरोधात आज पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

राज्यात पेट्रोल, डिझेल व खाद्य तेलाचे भाव मोदी सरकार वाढवत असून या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. गोरगरीब नागरिक कोरोना च्या संकटाला तोंड देत उदरनिर्वाह करत असून त्यामध्ये मोदी सरकार गोरगरिबांना लागणारे खाद्य तेल, गॅस सिलेंडर व पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून गोरगरिबांनी जगायचं तरी कसं त्यासाठी २० रोजी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांचे मार्गदर्शनाखाली  गाडीवर मोटरसायकल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे लावून तहसिल कार्यालयावर “मोदी सरकार हाय हाय”चा नारा देत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, नगरसेवक तथा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विकास पाटील, बशीर बागवान, वासुदेव महाजन, रणजीत पाटील, गोपी पाटील, अशोक मोरे, सतिष चौधरी, भगवान मिस्त्री यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content