नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । पेट्रोल आणि डिझेलचे दर हा आता सर्वसामान्यांसाठी रोजच चिंता करण्याचा मुद्दा झाला आहे. आज पुन्हा एकदा दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांत १३ वेळा इंधन दरवाढ झाली असून आतापर्यंत तब्बल 9.40 पैशांनी दर वाढवले आहेत.
तेल कंपन्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेल दोन्हीच्या किमतीत 80 पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे. दिल्लीत आता पेट्रोल 104.61 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 96 रुपये लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोल 119.67 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल 104 रुपये लीटरजवळ आहे. पुण्यात आज पेट्रोल दरात 86 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोल दर 119.13 रुपये आहे. तर डिझेल 101.84 रुपये लीटर आहे. कंपन्यांनी 15 दिवसांत 13 वेळा इंधन दरवाढ केली आहे. आतापर्यंत तब्बल 9.40 पैशांनी दर वाढवले आहेत. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर – दिल्लीत पेट्रोल 104.61 रुपये आणि डिझेल 95.87 रुपये प्रति लीटर; मुंबईमध्ये पेट्रोल 119.67 रुपये आणि डिझेल 103.92 रुपये प्रति लीटर; चेन्नईत पेट्रोल 110.09 रुपये आणि डिझेल 100.18 रुपये प्रति लीटर आणि कोलकातामध्ये पेट्रोल 114.28 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर झाले आहे.