आधी महसूल अधिकार्‍यांवर गंभीर आरोप, नंतर चक्क घुमजाव !

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महसूल अधिकार्‍यांना जीवंत बॉंबची उपमा देऊन त्यांच्याकडी कायदेविषयक अधिकार काढून घेण्याची मागणी करणारे नाशिकचे आयुक्त दीपक पांडेय यांनी घुमजाव केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नाशिक येथील पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पत्र लिहून महसूल खात्याच्या अधिकार्‍यांवर अतिशय गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यात त्यांनी महसूल अधिकारी हे आरडीएक्स’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे जिवंत बॉम्ब तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू केलीय. महसूल अधिकारी त्यांच्या कह्यात आहेत. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे द्यावेत, अशी सनसनाटी मागणी केली होती.

दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या सनसनाटी पत्रावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली  कामकाजात सुधारणा करण्यासाठी एखाद्या अधिकार्‍याने शिफारशी केल्या, तर त्याचे केव्हाही स्वागत आहे. मात्र, महसूल अधिकार्‍यांना आणि या विभागाला थेट आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या प्रकरणी  दीपक पांडेय यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.

यानंतर दीपक पांडेय यांनी महसूल मंत्र्यांची सपशेल माफी मागितली. थोरात सुजाण आणि चांगले मंत्री आहेत. त्यांना पत्रातील भाषा चुकीची वाटत असेल, तर मी माफी मागतो. या पत्रातून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. फक्त दोनशे वर्षांपासून सुरू असलेल्या त्रुटी दूर करण्याचा हेतू आहे. मी महसूल विभागाच्या विरोधात नाही. या विभागाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, असे वक्तव्य करून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Protected Content