यावल प्रतिनिधी । येथील बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल शहरातुन जाणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम लोकप्रतिनिधीच्या तक्रारी नंतर ही ठेकेदाराचे यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंताच्या हजेरीत निकृष्ट काम करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, यावल शहरातील बस स्टॅन्ड ते फॉरेस्ट कॉलनीपर्यंतच्या बऱ्हाणपुर ते अंकलेश्वर मार्गावरील सुमारे दीड कीलोमिटर रस्ता दुरूस्तीचे लाखो रुपये खर्चुन काम सद्या वेगाने करण्यात येत आहे. मात्र, हे काम संबधीत ठेकेदाराकडुन प्रशासन निविदाचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन अत्यंत निकृष्ठप्रतिचे करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी स्वतः कामावर पाहणी करतांना दिली होती. यावेळी त्यांनी ठेकेदाराने आपल्या कामाची गुणवता सुधारावी व डांबरचा होत असलेले अत्यंत कमी वापराबद्दल तक्रार करून नाराजी व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी या विषयी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगीतले असतांना देखील ठेकेदाराने बांधकाम अभीयंताच्या उपस्थितीतच रस्ता निकृष्ठ करण्याचे आपले कारभार सुरूच ठेवला आहे. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत असलेले लाखो रुपये खर्चा रस्ता दुरूस्तीचे होत असलेले काम हे येणाऱ्या पावसात राहील किंवा नाही असा ही प्रश्न नागरीकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.