रिक्षा उलटल्याने १२ जण जखमी : दोघांची प्रकृती गंभीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल बोरावल रस्त्यावरील शहरा पासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या हतनुर च्या पाटचारी जवळच्या उताराच्या रस्त्यावर अ‍ॅपेरिक्शा उलटल्याने १२जण जख्मी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब बोरावल रस्त्यावर हातनुरच्या पाटचारी जवळ काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यावल कुडून बोरावल गावाकडे जाणारी अ‍ॅपेरिक्शा वाहन पलटी झाले. या अपघातात कमलाबाई मधुकर पाटील वय ६० वर्ष, गुलाबचंद निशाद ( नाभिक ) वय७२ वर्ष , मनिषा खंडु महाजन वय ४२ वर्ष, वनदा गणपत बारेला वय १६वर्ष , सिमा केसराम बारेला वय२३ वर्ष, लेदलीबाई कृष्णा बारेला वय ४५ वर्ष , मजीला दुरासिंग पावरा , वय २३ वर्ष , कमलाबाई भास्कर धनगर वय४५ वर्ष , अशोक देविदास महाजन वय५५ वर्ष , संगीता अनिल पाटील वय३२ वर्ष , निर्मला राजाराम भालेराव , वय ५० वर्ष आणी उषाबाई सुरेश धनगर , वय ५० वर्ष सर्व राहणार बोरावल तालुका यावल असे१२ जण जख्मी झाले असुन यातील दोन जणांची प्रकती गंभीर आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना मिळेल त्या वाहनांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चार जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर, अपघात घडताच ऍपेरिक्शाचालक हा अपघात स्थळावरून पळुन गेल्याचे वृत्त आहे.

Protected Content