धरणगाव, प्रतिनिधी | येथील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेत सुरु असलेला भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे. सकाळी ११.०० वाजले तरी बँकेचे कर्मचारी बँकेत पोहोचलेले दिसून येत नाहीत. बँकेचे मॅनेजर स्वत:च दुपारी १.०० वाजेच्या सुमारास येतात त्यामुळे कर्मचाऱ्यांना धाक उरलेला नाही.
या सगळ्या प्रकारामुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. बँक व्यवहारांसाठी त्यांचा मोठा खोळंबा होत असतो. त्याचबरोबर कर्मचारीही अरेरावीच्या भाषेत ग्राहकांशी बोलताना दिसतात. या शाखेला कोणी वाली आहे का ? असा प्रश्न येथील नागरिक व शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत.