कोरोना : सावदा नगरपरिषदेने मुख्यमंत्री सहाय्यत निधीत योगदान द्यावे ; नगरसेवक वानखेडे

सावदा, प्रतिनिधी । देशासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. याचा संसर्ग वाढू नयेयासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. याकालावधीत खासगी क्षेत्र व कंपन्या बंद असल्याने शासनाकडे येणारा महसूल पूर्णपणे थांबल्याने सावदा नगरपरिषदेने मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीत १ कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी नगरसेवक राजेश वानखेडे यांनी नगरपरिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी शासनातर्फे उपचारावर व गोरगरिबांच्या जेवणासाठी, रेशनवर धान्य वाटप करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. याकरिता मुख्यमंत्री निधीत मदत करणे आवश्यक झाले आहे. सावदा नगरपरिषदेकडील विविध विकास निधी अंतर्गत तसेच ठेव, अनामत रकमेतून कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीप्रसंगी नगरपरिषदेने १ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावेत अशी मागणी नगरसेवक वानखेडे यांनी केली आहे.

Protected Content