शितल पाटील यांनी रेखाटले रतन टाटा यांचे चित्र

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  रतन टाटा यांनी कोरोनाकाळात केलेल्या अद्वितीय कार्याला सलाम म्हणून शीतल आर्ट क्लासेसच्या प्रशिक्षिका शितल पाटील यांनी त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनोखी मानवंदना देत त्यांचे स्केच बनविले आहे. त्यांच्या या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

 

रतन टाटा हे नाव ऐकलं की उद्योग आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून मिळालेलं तुफान यश आणि यशाच्या शिखरावर  आणि जागतिक श्रीमंताच्या यादीत गेलेलं नाव.. अशी ओळख आपण त्यांची अनेकांकडून ऐकतो, पण याच बरोबर ही व्यक्ती दानशूर असल्याचे अनेक वेळा सिद्ध झालं, भारतातील अनेक संकटकालीन घटना घडल्या त्यावेळी रतन टाटा यांनी केलेली मदत खरंच खूप मोठी आहे. “माझी अख्खी संपती गेली तरी चालेल पण भारतातून कोरोना  हद्दपार झाला पाहिजे”. अशी भावना सर्वांसमोर मांडणार व्यक्तीमत्व,  देवमाणूस म्हणून नावारूपास आलंय, खरंच इतरांच्या दुःखाला आणि अशा मोठ्या संकटाला मदतीचा हात देणारा हा देवमाणूस आहे यात शंका नाही.

Protected Content