अखेर वाधवान कुटुंबियांवर गुन्हा दाखल

सातारा । लॉकडाऊनचे उल्लंघन केल्या प्रकरणी उद्योगपती कपिल वाधवान, त्यांचे कुटुंबीय व नोकरचाकर अशा एकूण २३ जणांवर महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाधवान कुटुंब हवापालटासाठी खंडाळ्यातून महाबळेश्‍वर येथे आले होते. वाधवान कुटुंबाने या प्रवासासाठी गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र घेतले होते. या अनुषंगाने वाधवान कुटुंबातील कपिल वाधवान, अरूणा वाधवान, वनिता वाधवान, टिना वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, युव्हिका वाधवान, आहान वाधवान यांसह त्यांच्या सोबत आलेले त्यांचे कर्मचारी शत्रुघ्न घाग, मनोज यादव, मनोज शुक्ला, अशोक वाफेलकर, दिवान सिंग, अमोल मंडल, लोहीत फर्नांडीस, जसप्रित सिंग, जस्टीन डिमेलो, इंद्रकांत चौधरी, एलिजाबेथ अय्यपिल्लई, रमेश शर्मा, प्रदिप कांबळे व तारका सरकार या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ब, महाराष्ट् कोविड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे तसेच भादंवि कलम १८८, २६९, २७०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वाधवान कुटुंबाने खंडाळा ते महाबळेश्‍वर या प्रवासासाठी वापरलेल्या आलिशान पाच गाड्या पाचगणी येथून जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content