सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या जिल्ह्यातील १७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । सोशल मिडीया, फेसबुक, व्हाटसअँपवर कोरोना रोगाच्या अनुषंगाने दोन धर्मात, दोन जातीत तेढ, तिरस्कार निर्माण होईल असा मजकूर टाकणाऱ्या जिल्ह्यातील १७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी गेल्या १६ दिवसांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन करत सोशल मीडियावर अफवा पसरविल्याचे संदेश पोलीस प्रशासनाला मिळाले असून अशांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

या १७ जणांवर केली प्रतिबंधात्मक कारवाई
(१) संदीप अशोक खाचणे, रा. खाचणेवाडा, निभोरा बु. ता.जि. जळगाव, (२) विनायक अशोक कोळी उर्फ विक्की, रा. सत्यम पार्क, आव्हाणे शिवार, जळगाव, (३) रत्ना किशोर नाथ जोगी, रा. गांधी चौक, पिंप्राळा, जळगाव, (४) ओमप्रकाश नारायणदास मुंदडा, रा. पटवारी कॉलनी, गणेश कॉलनी, जळगाव, (५) मिलिंद मछिंद्र सोनावणे, रा. हातेड खु, तालुका – चोपडा जिल्हा – जळगाव, (६) सुरेश ल. विसपुते, रा. गजानन महाराज नगर, भुसावळ, (७) पुंडलिक शंकर कोळी, रा. वाडर दरवाजा, शेंदुर्णी, तालुका – जामनेर, जिल्हा – जळगाव, (८) लखन सुरेश सांगिले रा. निमखेडी शिवार साईनगर, हल्ली मुक्काम – दांडेकर नगर, जळगाव, (९) जाफर शकील खाटीक, रा. समतानगर, वंजारी टेकडी, जळगाव, (१०) जुबेर अकील खाटीक, रा. समतानगर, वंजारी टेकडी, जळगाव, (११) रमेश पांडुरंग इंगळे, रा. आराधना कॉलनी, खळवाडी, भुसावळ, (१२) अंकीत उर्फ देविदास प्रल्हाद पाटील, रा. जिव रामनगर, खोटे नगर, जळगाव, (१३) रविंद्र भिवा सोनावणे, रा. प्लॉट न. २०,गट नं. २५, शिवधाम मंदिराजवळ, जळगाव, (१४) लखीचंद एकनाथ कोळी, रा. प्लॉट न. २०,गट नं. २५, शिवधाम मंदिराजवळ, जळगाव, (१५) मनोज दिलीप सपकाळे, रा. आव्हाने, तालुका जिल्हा – जळगाव, (१६) गणेश दगडू घोपे रा. जयजवान चौक, मेहरूण, जळगाव, (१७) सैय्यद अकबर सलाउद्दीन रा. समतानगर, वंजारी टेकडी, जळगाव

पोलीस प्रशासनाचे आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोनीही व्हॉटस्‌ॲपवर, फेसबुक, ट्विटर किंवा इतर कोणत्याही सोशल मिडीयाद्वारे कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवु नयेत किंवा दोन समाजामध्ये धार्मीक तेढ निर्मान होईल अशा पोस्ट करु नयेत. सोशल मिडीयावर अफवा पसरविण्याऱ्‍यांवर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

Protected Content