पाचोऱ्यात शिवजयंतीनिमित्त त्वचारोग निदान शिबीराचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील लोकसेवा हॉस्पिटल, बस स्टँड समोर, नागसेन नगर गेटच्या बाजूला उद्या शिवजयंतीनिमित्त भव्य त्वचारोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत घेण्यात येणाऱ्या या शिबारात तपासणी फी नाममात्र ५० रुपये, लेझर आणि सर्जिकल उपचाराची गरज असल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. या शिबीरात येणाऱ्यां रुग्णांसाठी शिबिरातील तपासणी उपचार तसेच त्वचेचे आजार, केस गळती, टक्कल पडले असेल तर हेअर ट्रान्सप्लांट (डोक्यावरील केस प्रत्यारोपण) यासोबतच लेझर ट्रीटमेंट उपलब्ध, हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध, गोंदलेले (टॅटू) लेझर द्वारे काढले  जातील.

सदर शिबिरात हायड्राफेशियल तज्ञ डॉ. गोल्डमेडलिस्ट डॉ.शिवानी मिश्रा (एम. बी. बी. एस., एम. डी. (त्वचा रोग व सौंदर्य तज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचा रोग, पांढरे कोड, पुरळ मुरुमे, व्रण, इसब, उवा होणे अॅलर्जी किंवा वावडे, कंडू, कंडुरोग, कोड, खरुज, खाज, गळू, घामोळया, चिखल्या, जळवात (पायाला भेगा पडणे), डोक्यातील कोंडा, केस गळती, ताजी जखम, त्वचेचा रंग बदलणे, नागीण, नायटा, गजकर्ण या आजारांची तपासणी केली जाणार आहे.

संबंधित आजाराशी निगडीत रुग्णांनी तपासणीला येतांना पूर्व नाव नोंदणी करणे अनिवार्य असुन याकरिता अधिक माहितीसाठी मो‌ क्रं. ९९२८६२७६२६, ९२८४९१९३६०, ९५२७९१३६३४,  ९६६५९१४१९१ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

Protected Content