जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात डॉक्टर्स दिनानिमित्त नुकतच इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगावतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी समूहाचे संस्थापक/अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे होते. डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांच्या मागे येत असलेल्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना बाजूला होत, आदराने त्यांच्या आसनावर विराजमान होण्याचे विनंती केली. हा आदरभाव पाहून आयुक्त डॉ.विद्या गायकवाड ह्या काहीशा भावनिक झाल्या. तर आय.एम.ए हॉलमध्ये बर्याच जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. खरं तर डॉ. उल्हास पाटील यांच्या वागण्यातून बोलण्यातून निरंतर हा आदरभाव दिसत असतो. त्यांच्यावर झालेल्या गोदावरी आईच्या संस्काराची हिच खरी शिदोरी आहे.