शोकाकुल वातावरणात शहीद सुनील हिरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडगाव खु. येथील शहिद जवान सुनील हिरे यांच्यावर मूळगावी शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहानग्या दोन्ही मुलांकडून शहीद सुनील हिरे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आली.

भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील जवान सुनील हिरे हे इंडो तिबेट सीमा सुरक्षा दलात सैनिक म्हणून देश सेवा बजावत होते. अरुणाचल प्रदेशातील तेजु या ठिकाणी कर्तव्यावर असतांना परवा म्हणजे २२ जून रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अगोदर इंदोर या ठिकाणी आणि नंतर वाहनाने खेडेगाव येथे आज सकाळी आणण्यात आले गावात त्यांचे पार्थिव अगोदर राहत्या घरी आणण्यात आले यावेळी संपूर्ण कुटुंबातील सदस्य सोबतच उपस्थित्यांनाही अश्रू अनावर झाले होते नंतर त्यांच्या समवेत आलेला जवानांनी खांदा देत शाहिद सुनील हिरे त्यांचे पार्थिव फुलानी सजवलेल्या ट्रकर ठेवले देशभक्तीपर गाणे वाजवत गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खान्देश रक्षक ग्रुप च्या सदस्यानी शिस्तबद्ध आंतयात्रेचे नियोजन केल्याचे दिसुन आले. शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी भारताचा तिरंगा ध्वज हातात घेत शाहिदास मानवंदना दिली.

गावापासून ते अंतविधीच्या ठिकाणापर्यंत जवळपास १ किमी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रोंगोळ्या काढन्यात आल्या होत्या यावेळी शाहिद जवान सुनील हिरे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणांनी आसमंत दुमदुमून निघाला होता नंतर गावाबाहेरील मोकळ्या जागेत हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी जड अंतकरणाने शाहिद जवाणास अखेरचा निरोप दिला यावेळी सैन्य दलाच्या वतीने तसेच पोलिसांकडून बंदुकीच्या ३ फेरी झडत मानवंदना देण्यात आली. मुलगा राज आसनी जय याने पित्यास मुखाग्नी दिला. 

या प्रसंगी आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर सैन्य दलातील अधिकारी, इएसआय सुखविंदर कुमार, हेड कॉ जेडी गोयल कमलेश, जवान दीपक साळुंखे, योगेश पाटील, राजेंद्र काशीनाथ,यांच्यासह अरुणाचल प्रदेश येथून पार्थिवा समवेत आलेले जवान नितीन आहिरे आजी माजी सैनिक, खान्देश रक्षक ग्रुपचे सदस्य, तालुक्यातील जवळपास सर्वच गावांचे पोलीस पाटील पंचक्रोशीतील नागरिक, महिला, आणि विशेष म्हणजे तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. शाहिद सुनील यांच्या पच्याशात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पत्रकार संजय हिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे, सैन्य दलातील जवान कौतीक हिरे यांचे ते भाऊ होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!