पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील भारतीया नगर मधील रहिवाशी अजहर खान अय्युब खान यांची भारतीय लोकराज्य पार्टीच्या जळगांव जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे ध्येय धोरणे व विचारानुसार अजहर खान अय्युब खान यांची दि. १ जुलै २०२२ ते ३० जून २०२३ पर्यंत करण्यात आली असून त्यांना नियुक्तीचे पत्र भारतीय लोक राज्य पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सहीने प्राप्त झाले आहे.
सदरच्या नियुक्ती बद्दल अजहर खान अय्युब खान यांचेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.