मानमोडी येथे बली प्रतिपदा दिनानिमित्त मुठमाती कार्यक्रम उत्साहात

बोदवड, प्रतिनिधी| तालुक्यातील मानमोडी येथे बलीप्रतिपदा दिनाचे औचित्य साधून सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दफन करून राज्यव्यापी मूठमाती कार्यक्रम स्वतंत्र भारत पक्षाने उत्साहात संपन्न केला.

दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदा दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र बळीराजाला वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकार व शेतकरी व सामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या भ्रष्ट, दमनकारी व्यवस्था नावाच्या लुटारू व्यवस्थेला मूठमाती देऊन पुन्हा बळीराज्य प्रस्थापित करण्यासाठी तालुक्यातील मानमोडी येथे स्वतंत्र भारत पक्षांकडून राज्यव्यापी मुठमाती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या व्यवस्थेचा अंत करण्याची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. दरम्यान सदर कार्यक्रम कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. तसेच केंद्र किंवा राज्य सरकारच्य‍ा विरोधात नाही. कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. शोषण करणार्‍या व्यवस्थेच्या विरोधात आहे. हे आंदोलन नाही व मागण्या ही नाहीत. सरकार जनतेची लूट करते, ठराविक व्यक्तींनाच आर्थिक लाभ मिळवून दिला जातो. निवडणुका जिंकण्यासाठी शेतीमालाचे दर पाडले जातात. लायसन परमिट राजमुळे भ्रष्टाचार बोकाळतो. युवकांना रोजगाराच्या संधी निर्म‍ाण होऊ दिल्या जात नाहीत. ऐतखाउंचे लाड व श्रमिक, व्यवसायिक, उद्योजकांची पिळवणूक या सरकारी व्यवस्थेत होत आहे. स्वतंत्र भारत पक्षा मार्फत हे गावकर्‍यांना यावेळी समजून सागीतले. तत्पूर्वी सर्व पक्ष हे सारखेच आहेत. हे आता सिध्द झाले आहे. अशी लुटरू व्यवस्था उलथून टाकून सर्वांच्या हिताचे “बळीराज्य” स्थापन कण्यासाठी स्व. शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्ष निर्माण केला आहे. हा सर्वांच्या हिताचा पक्ष अनेकांना माहित व्हावा, सव.भा.प चा विचार सर्वांपर्यंत पोहोचवला जाईल. सर्वांना न्याय, सुरक्षा मिळणे आणि सर्व जनता समृद्ध होणे. हे स्व. भा. प चे लक्ष आहे. भ्रष्ट, लुटारू व जनतेला गुलाम बनविणार्‍या व्यवस्थेचा पाडाव करून खर्‍या अर्थाने जनतेच्या हिताची व्यवस्था देशात कार्यरत व्हावा. हेच पक्षाचा उद्देश आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी ऊत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख कडु अप्पा पाटील, जिल्हा अध्यक्ष दगडु शेळके, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, पंडित अटाळे, समन्वयक प्रेमराज खडके, जळगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, यावला तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष प्रविन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघ, संतोष पाटील, नाना पाटील, राजु चौधरी, सुवर्ण सिंग हजारी याच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळे कडु अप्पा पाटील व दगडु शेळके यानी सरकारच्या शेतकरी विरोधातील धोरणाबाबत माहिती दिली.

Protected Content