


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार २६ जुलैपासून सुरू होणार आहे. पॅरिसमध्ये १०० वर्षांनंतर ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येत आहे. परिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये २०६ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचे १०,५०० खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी भारतातील २८ खेळाडूंचा गट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचा झेंडा फडकवणार आहे. भारतीय चमुचे नेतृत्व विश्वविजेता नीरज चोप्रा करणार आहे.
नुकतेच नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पॅरिसमध्ये होणारी डायमंड लीगही सोडली होती. नीरज चोपरी याच्या नेतृत्वाखालील पॅरिस ऑलिम्पिक संघात १७ पुरुष आणि ११ महिला खेळाडूंचा समावेश आहे. रेस वॉकर प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंग या वर्षी ॲथलेटिक्समध्ये पात्र ठरणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले. याशिवाय हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अविनाश साबळे आणि तजिंदरपाल सिंग तूर हे खेळाडूही या संघात आहेत. यावेळी सर्वांचे लक्ष ४x४०० मीटर रिले संघावर असेल. या संघाने बहामास येथे होणाऱ्या जागतिक ऍथलेटिक्स रिले २०२४ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या संघात मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे.



