Home राज्य राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान

राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागाने दिली आहे.

अल्पसंख्याकांना संविधानाने दिलेल्या हक्काचे संरक्षण करणे. अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना बाबतीत शासनास शिफारस करणे आदि स्वरुपाची कामे केली जातात. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ आयोगाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुढील 5 वर्षांकरिता नियुक्ती असते.


Protected Content

Play sound