अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांची गावागावात प्रचार रॅली

prabhakar sonawane

 

चोपडा प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांची आज (दि.14) शहरातील आडगाव, विरवाडा, वडती, विष्णापूर, नरवाडे, बोरखेडा, नारद, खरद, अंबाडे, रुखनखेडा आदी गावामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली.

प्रचारात दिवसेंदिवस आघाडी घेत भाजपाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे हे चोपडा विधानसभा क्षेत्रात घराघरापर्यंत पोहचले आहेत. त्यांना मिळालेल्या प्रतिसाद पाहता आडगाव, विरवाडा, वडती, विष्णापूर, नरवाडे, बोरखेडा, नारद, खरद, अंबाडे, रुखनखेडा आदी गावामध्ये स्वयंस्फूर्तीने लोक समोर येऊन प्रभाकर सोनवणे आपणच निवडून यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन देत, आम्ही सर्व ग्रामीण भागातील मतदार घरा-घरांपर्यंत बॅट पोहचवू, तुम्ही विकास गंगा आमच्यापर्यंत आणा हीच आमची अपेक्षा आहे. असे गावातील नागरिक बोल होते. याचबरोबर गावकरी म्हणत होते की, “आप्पा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है” भावी आमदार कसा पाहिजे, प्रभाकर आप्पा सारखा पाहिजे, अश्या विविध घोषणा देत गावागावात ढोल ताश्यासह प्रभाकर आप्पाचे भव्य स्वागत करत प्रचार रॅली काढण्यात आली.

यावेळी चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, चंद्रशेखर पाटील, भाजपाचे मुलुख मैदान तोफ शांताराम पाटील, भाजपाचे चंद्रशेखर पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील, शांताराम सपकाळे, प्रदीप पाटील, लक्ष्मण पाटील, डी.पी.साळुंखे चांदसनी, गजेंद्र पाटील हातेड, माजी जि.प.सद्स्य कल्पना कोळी, शेखर ठाकरे मंगरूळ, रमेश कोळी, जितेंद्र पाटील, जितेंद्र महाजन धानोरा, राजेंद्र ढाबे, एकनाथ पाटील, अनुप पाटील, सचिन पाटील, प्रदीप पाटील, विनायक पाटील, भाऊसाहेब पाटील, दशरथ पाटील, रुसूम तडवी, हिम्मत पाटील, भूषण तडवी (बिडगाव), रामचंद्र भादले, हिम्मत पाटील, पप्पू पाटील, भिवराज रायसिंगे, रोहिदास अहिरे, राधेश्याम गवळी, रामचंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महानोर पाटील गोरगावले, सुंदना पाटील गणपूर, सचिन धनगर अंबाडा, विजय बाविस्कर सुटकार, दीपक पाटील घुमावल, भैय्या पाटील, रविंद्र कोळी, गोकुळ कोळी, प्रवीण कोळी, चंद्रकांत कोळी, प्रदीप राजपूत, नादान पावरा, निबा तायडे, नाना वाघ, प्रवीण कोळी, भूषण सोनवणे, गोकुळ राजपूत, किशनसिंग राजपूत, संजय गिरासे, भैय्या राजपूत विरवडा, दीपक धनगर (सरपंच नरवाडे), जगन्नाथ माळी, भगवान धनगर, भीमराव धनगर, दगडू माळी, जयराम ट्रेलर, निळकंठ धनगर, महेंद्र पाटील, वासुदेव धनगर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Protected Content