सुभाषवाडीत पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावाच्या बस स्थानकाजवळ शेकडो ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल – ताश्यांच्या गजरात शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. संत सेवालाल महाराज सभागृहाचे व स्मशानभूमी कडे जाणार्‍या रस्त्याचे खडीकरण कामांचे भूमीपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावात व परिसरात भगवे झेंडे, मोठ – मोठे बॅनर व भगव्या पताका लावून परिसरातील वातावरण भगवामय झाले होते. कार्याक्रमचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले तर प्रास्ताविकात जेष्ठ शिवसैनिक राजाराम राठोड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावात पाण्याची योजना, व्यायामशाळा, रस्ते कॉन्क्रीटीकरणासह केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली . आभार लोकनियुक्त सरपंच कु. जयश्री राठोड यांनी मानले.

शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्य कर्तुत्वावर विश्वास ठेऊन वराड खु. येथील अशोक काळे, विठ्ठल काळे, दादा भालेराव, गणेश काळे, ईबा खान, धोंडू मोरे, अशपाक खान, बुधाकर काळे, प्रकाश काळे, ज्ञानेश्वर काळे,गजानन पांचाळ, तसेच लोणवाडी येथिल, संदीप पाटील, गजानन पाटील, श्रावण पाटील, अनिल भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना भगवा रुमाल परिधान करून सत्कार केला.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी जिल्हा परिषद पवन सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण ,जेष्ठ शिवसैनिक राजाराम राठोड , लोकनियुक्त सरपंच कु. जयश्री राठोड, उपसरपंच छगनदास राठोड, ग्रामसेवक किशोर खोडवे, शाखा प्रमुख नवलसिंग राठोड , दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, कैलास चौधरी, उपतालुका प्रमुख सदस्य संदीप सुरळकर, महिला आघाडीच्या सारीताताई कोल्हे – माळी, शोभाताई चौधरी, शीतल चिंचोरे, युवासेनेचे रामकृष्णा काटोले, समाधान चिंचोरे, रवी कापडणे, साहेबराव वराडे , सचिन पाटील, पी. के. पाटील, नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे , संजय घुगे, जितु पाटील, उपसरपंच कैलास जाधव , साईदास राठोड यांच्यासह म्हसावद, वराड , लोणवाडी , जवखेडा व परिसरातील सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाच्या एकीच्या जोरावर गावातील कोणते काम अशक्य नाही. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, ग्रामपंचायत मध्ये येणार्‍या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवा. ग्रामपंचायत म्हणजे गाव विकासाला दिशा देणारे केंद्र आहे. शासन महिला बचत गटांसाठी नवीन योजना सुरु करणार असून बंजारा तांड्यातील उर्वरित विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहे. गावातील गटार बांधकामासाठी २० लक्ष मंजूर केल्याची घोषणा करून युवकांसाठी ५ लाखाचे ओपन जिमसाठी साहित्य ८ दिवसात देणार. जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांच्या कार्याची उणीव भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Protected Content