प्रतिलिटरमागे दोन रूपयांनी दुधाच्या दरात वाढ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात अमूल दुधाच्या किमती प्रति लिटरमागे दोन रुपयांनी वाढल्या असून, 3 जून 2024 पासून हे नवे दर लागू झाले आहेत. अमूल कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल, अमूल शक्ती या दुधाच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशभरात फक्त अमूलच नव्हे तर, येत्या काळात पराग, मदर डेअरी या संस्थांकडूनही दुधाच्या दरात वाढ केली जाणार आहे.

दूध दरातील वाढ लागू केल्यानंतर अमूल गोल्डच्या किमती प्रति लिटर 66 रुपे, अमूल टी स्पेशल 64 रुपये आणि अमूल शक्ती 62 रुपयांवर पोहोचलं आहे. म्हणजेच अर्धा लिटर अमूल गोल्ड दूध आता 32 रुपयांना, 500 मिली अमूल स्टँडर्ड 29 रुपयांना, अमूल ताजा 26 रुपयांना आणि अमूल टी स्पेशल प्रति 500 मिलिसाठी 30 रुपयांना उपलब्ध असेल. सध्याच्या घडीला फक्त दुधच नव्हे, तर अमूलचं दहीसुद्धा महाग झाल्याचं सांगण्यात येत आहे. 1 एप्रिल 2023 म्हणजेच जवळपास 14 महिन्यांनंतर अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आली आहे. यापूर्वीही दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले होते. गुजरात सहकारी दूध विपणन संघच्या माहितीनुसार गांधीनगर, सौराष्ट्र आणि अहमदाबाद येथील बाजारात शनिवारपासूनच दूध दरवाढ लागू झाली आहे.

Protected Content