‘मराठी भाषा गौरव दिना’च्या अनुषंगाने मराठी प्रेमींसाठी आंनदाचे संकेत

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री मंत्री किसन रेड्डी यांची दिल्लीतील परिवहन भवन येथे भेट घेतली. राज्याच्या शिष्टमंडळासह झालेल्या या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

दि.२७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी मराठी प्रेमींसाठी आंनदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक असून मराठी भाषा गौरव दिनाचा मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री मंत्री किसन रेड्डी यांना आमंत्रण देण्यात आले असून याच दिवशी ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा’ मिळाल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्र्यांनी करावी, अशी विनंती सुभाष देसाई यांनी सांस्कृतिक मंत्र्यांना केली आहे.

Protected Content