राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज नपुंसक – भिडे

bhide guruji

सातारा, वृत्तसंस्था | राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. इतकेच नाही तर सुधारित नागरिकत्व कायदा हा देशाला बळ देणारा कायदा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

जगातल्या १८७ देशांमध्ये नागरिकत्वासंबंधीचा कायदा आहे. मग भारतात हा कायदा का नको? सी.ए.ए.ला विरोध करणारे लोक देशाची दिशाभूल करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या कायद्याची मागणी केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा कायदा आणला होता. आता हेच लोक या कायद्याला विरोध दर्शवत आहेत, ही बाब आश्चर्यकारक आहे असंही भिडे यांनी स्पष्ट केले.

Protected Content