आय.ए.एस.पदमसिंग पाटील यांचा गो. से. हायस्कूलने केला सन्मान

पाचोरा प्रतिनिधी । येथील श्री. गो. से.हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि सध्या दिल्ली केंद्र सरकारच्या रासायनिक आणि खत विभागात संचालक म्हणून कार्यरत असलेले आय. ए. एस. अधिकारी पदमसिंग पाटील यांचा शाळेच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे. 

गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्यात पदमसिंग पाटील यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना पदमसिंग पाटील यांनी शाळेच्या आठवणी सांगत स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची आणि यश मिळवण्याची जिद्द बाळगल्यास सहज यश प्राप्त करता येऊ शकते असे मनोगत मांडले तर शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी पदमसिंह पाटील यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून केवळ शाळाच नव्हे तर तालुक्यासाठी देखील अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले.

पदमसिंग पाटील हे पाचोऱ्यासह जिल्ह्यातील अनेक तरुणांसाठी  आदर्श ठरलेले आहेत.केंद्र शासनाच्या प्रत्यक्ष कर विभागात उपनियंत्रक,  औद्योगिक मंत्रालय विभागात उपनियंत्रक,  गृहनिर्माण व महानगर विभागात उपनियंत्रक,  अप्रत्यक्ष कर प्रणाली उपनियंत्रक, कस्टम विभागात उपनियंत्रक तसेच लोक वित्तीय नियोजन प्रणालीत महाराष्ट्र ,गोवा, गुजरात, केरळ, या राज्यांचे नोडल अधिकारी अर्थ मंत्रालय सहाय्यक लेखन नियंत्रक म्हणून त्यांच्या कार्याची छाप त्यांनी सोडली आहे.

यावेळी पदमसिंह पाटील यांचे वडील प्रदीपसिंग पाटील शाळेच्या उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ, पर्यवेक्षक आर. एल.पाटील, एन. आर.ठाकरे आणि ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर  व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले तर कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content