जळगाव जिल्ह्यात ४ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद

1

1

जळगाव (प्रतिनिधी) कोल्हापूर, सांगलीनंतर आता पावसाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, कान आदी नद्यांना महापूर आला आहे. खान्देशातील १४ तालुक्यांमध्ये तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल,चोपडा,अमळनेर या ४ तालुक्यांत अतिवृष्टी नोंद झालीय.

खानदेशातील १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठ दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबार येथे कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थित उद्भवली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक महामार्ग ठप्प झाले असून घरांची पडझडही झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल, अमळनेर, चोपडा या ४ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले असून, कळमसरे गावास पाण्याचा वेढा पडला आहे. तर नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही सर्व चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.

 

जळगाव जिल्ह्यात साहित्य सज्ज

 

अमळनेर, रावेर, जामनेर व जळगाव येथे चार नग फायबर बोटी व लाईफ जॅकेट, लाईफ रीग, सर्च लाईट, दोरखंड आदी साहित्य वितरीत करण्यात आले असून ते सज्ज ठेवण्यात आले आहे. संततधार पाऊस तसेच पांझरा व तापी नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचाºयांच्या रजा, सुट्या रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Protected Content