महामार्गावरील पहूर पेठ हद्दीत रस्ता व मोरी बांधा

 

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील नदीपात्रावर राष्ट्रीय महामार्ग पुलाचे काम होत असून बस स्टॅंडवर जाण्या येण्याकरिता पहूर पेठ हद्दिकडून रस्ता व मोरी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व दोनही गावातील नागरिकांनी अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना यांना निव्दानाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, शनीदेवाच्या मंदिरासमोर जुना पुल नदिवरील रस्ता तयार करण्यात यावा. गावाचे दोन्ही बाजूने रस्ते ठेवून या गावातून त्या गावात लोखंडी दादरे, ठेवण्यात यावे. यासाठी माजी जि. प.कृषी सभापती व पहूर पेठचे माजी सरपंच प्रदिप लोढा, उपसरपंच शाम सावळे, ईश्वर बारी, शरद भागवत पांढरे, रविंद्र मोरे यांच्यासह पहूर पेठ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनच्या सह्या असलेले निवेदन अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना, परिवहन केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी , पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हाधिकारी यांना माहिस्तव प्रत रवाना करण्यात आली आहे.

Protected Content