धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्मार्ट व बोलकी अंगणवाडी उपक्रमात अंगणवाडीचे रूप पालटणार असून, मुलांना विविध विषयांची सहज ओळख व शिक्षणाप्रती गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे, अंगणवाडीत भिंतीचा मुलांना उपयुक्त माहितीसाठी अधिकाधिक कल्पक पद्धतीने वापर करावा. या अभिनव उपक्रमामुळे अंगणवाड्यांचे रूपडे पालटणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाच्या विकासासठी निधीची कमतरता भासू देणार नसून बांभोरी बु. गावाजवळील लहान पुलाच्या कामासाठी मुलभूत सुविधा योजने अंतर्गत किंवा गौण खनिज मधून सुमारे ३५ लक्ष निधी मंजूर करणार असल्यचे सांगितले. तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रेमराज पाटील हे होते.
३३ लक्ष निधीच्या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !
गावांतर्गत ६ लक्ष आमदार निधीतून करण्यात आलेल्या बसस्थानक परिसरातील काँक्रीट रस्त्यांचे लोकार्पण, डीपीडीसी अंतर्गत १० लाखाच्या स्मशानभूमीचे बांधकाम व सुशोभीकरण, गावांतर्गत नव्याने ६ लक्ष निधीतून रस्ता काँक्रीटीकरण व स्मार्ट व बोलकी अंगणवाडी व बाला (बिल्डिंग ॲज लर्निंग एड) उपक्रमात तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बांभोरी बु. येथे ‘‘अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंबांनी आनंदाचा शिधा – दिवाळी किट वाटपही पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि यांचे हस्ते करण्यात आले.
” बाला ” अंगणवाडीचे वैशिट्ये
जिल्ह्यात ” बाला ” उपक्रमात अंगणवाड्यांची आकर्षक रचना करण्यात येत आहे. सृष्टीजीवन, अंकलिपी, अक्षरओळख करून देण्यासाठी भिंतीवर आकर्षक चित्रांसह उपयुक्त वनस्पती, आरोग्यदायी भाज्या पोषक आहाराचे महत्व पटवून देणारे ‘अक्षयपात्र’, छोटे उद्यान, मुलांना सुलभ हालचालींसाठी कक्ष, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील सर यांनी केले तर आभार माजी सरपंच सुभाष पाटील यांनी मानले. या प्रसंगी माजी उपसभापती प्रेमराज पाटील, डी. ओ. पाटील, मोतीलाल पाटील, माजी सरपंच सुभाष पाटील, रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य शैलेश पाटील, गोपाल सोनवणे, भगवान पाटील, राजू पाटील, संजय पाटील, लक्षमण पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, अंकुश पाटील, राहुल पाटील, निंबा कंखरे, रवींद्र कंखरे, युवासेनेचे पवन पाटील, चेतन पाटील, भैया मराठे, बोरगावचे नितीन पाटील सर, यांच्यासह ग्रामस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते.