जामनेरात कृषी विभागामार्फत कार्यक्रम

 

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील गाडेगाव या गावांमध्ये कृषी विभागामार्फत “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी गाव भेट” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गावामध्ये क्षेत्रीय भेट आयोजित करून कृषी विभागातील विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांनी गावातील शेतकऱ्यांसोबत सुसंवाद साधून शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनां बाबत मार्गदर्शन केले. तसेच आगामी रब्बी हंगामातील पूर्वतयारी साठी बीज प्रक्रिया याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. गोपीनाथ मुंडे अपघात विमा, पी. एम. एफ. एम. इ. योजना, पौस्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत तृणधान्य वर्गीय पिकांची लागवड करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच किसान क्रेडिट कार्ड तयार करणे, महाडीबीटी योजनेअंतर्गत यांत्रिकीकरण योजना, शेडनेट, पॉली हाउस अशा विविध योजनांचा लाभ घेणे मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी सहाय्यक आर.जी. निकम यांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेची मांडणी केली. कार्यक्रमासाठी राकेश पाटील उपस्थित होते. उपसरपंच तुषार पाटील, ग्रामस्थ शरद भारंबे, माणिक नारखेडे, अरविंद भारंबे, भागवत कुरकुरे, चंद्रकांत भारंबे तसेच इतर शेतकरी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भास्कर राणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आर.जी. निकम यांनी केले.

Protected Content