कृषी उत्पन्न बाजार समीतीची फि चुकविल्याने व्यापारी दंडात्मक कार्यवाहीसाठी ताब्यात

यावल प्रतिनिधी ।  केंद्र शासनाने पारीत केलेल्या नव्या कृषी विधेयकाचा गैरफायदा घेत तालुक्यातील काही व्यापाऱ्यांनी बाजार समीतीची फी व शासनाची सुपरव्हिजन फि चुकवत असल्याने बाजार समीतीकडून एका व्यापाऱ्‍याला गव्हाने भरलेला ट्रकसह रावेर तालुक्यातील भोकरी येथून ताब्यात घेण्यात आले असून कार्यवाहीस सुरवात केली आहे.

याबाबत येथील बाजार समीतीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांनी सांगीतले की, तालुक्यातील दहीगाव येथील व्यापारी लक्ष्मण चौधरी यांनी १८ मार्च रोजी गव्हाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच-१९झेड १३६२) हा रावेर तालुक्यातील भोकरी येथील जीनींग कडे जात असतांना चौकशीसाठी थांबविला असता सदर ट्रकचालकाने ट्रक हे गव्हाने भरलेले असल्याचे सांगीतले. सदर ट्रकचा पंचनामा करून दंडात्मक कार्यवाहीसाठी व्यापाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. कोणतीही बाजार फि अथवा शासकीय सुपरव्हिजन फि न भरता हा कृषी माल नेला जात होता. व्यापा-यांनी कृषी उत्पन्न बाजार समीती फि व शासकीय फी न भरता वाहतुक केल्यास वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे. 

सद्या राज्यातील बाजार समीतीचे कामकाज राज्य शासनाचे निर्देशानुसार सुरू आहे. मात्र काही व्यापारी नविन विधेयकाच्या नावे बाजार समीती व शासनाची फसवणूक करून शासकीय फी चुकवित आहेत. असे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी दिलेल्या माहीती पत्रकात सांगीतले.

 

Protected Content