पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड, गरवारे कॉलेज स्टेशन से रूबी हॉल या दोन योजनांचा समावेश आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांचा आता वाहतूक कोडींतूनही सुटका होणार आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा तासाचा प्रवास काही मिनिटांवर आला आहे. पिंपरी चिंचवडवरुन २५ ते ३० मिनिटांत पुणे शहरात येता येणार आहे.
या नवीन मार्गाच्या लोकार्पणामुळे पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रोचे किमान भाडे १० रुपये असून कमाल भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी ४० मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३० टक्के सवलत असणार आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३० टक्के सवलत असणार आहे. तसेच मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे. मेट्रो कार्ड लवकरच विक्रीस उपलब्ध होणार असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.