स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा वितरण केंद्राचा शुभारंभ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’ निमित्त दि. दि. १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस ‘हर-घर-तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार पाचोरा शहरात विविध ठिकाणी तिरंगा ध्वज वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविणेबाबत शासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार पाचोरा शहरात नगरपरिषद कार्यालय, राजे संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच रुद्रयुग इंटरप्राजेस, नवकार प्लाझा इत्यादी ठिकाणी तिरंगा ध्वज वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

या पार्श्वभूमीवर उपरोक्त नमूद ठिकाणी तिरंगा ध्वज वितरणाचा शुभारंभ मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. असून वितरण केंद्रास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. यावेळी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, ललित सोनार, नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त घरोघरी तिरंगा हा कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.

Protected Content