बोदवड, प्रतिनिधी | जागृत मरिमाता देवस्थान शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट बोदवड जळगाव (जे.एम.डी ) प्लानेट आर्ट प्रस्तुत कला सन्मान या पैंटिंग प्रदर्शनाचे उदघाटन दिनांक ३१ आक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता कुमार स्वामी हॉल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, काळा घोडा, मुंबई येथे कण्यात आले. या प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी आमदार राहुल नार्वेकर, सिनियर आर्टिस्ट व लेखक प्रकाश बाल जोशी, चित्रपट निर्माते अब्दुल सिद्दीकी, ट्रस्टचे संथापक देविदास राखोंडे, सिनियर आर्टिस्ट सुरेंद्र राव, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कला संम्मान प्रदर्शन हे प्रदर्शन दिनांक १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत खुले असणार आहे. कलावंतांना प्लॅटफॉम् मिळावा यासाठी संस्थेचे संस्थापक देविदास राखोंडे आणि सभासद आर्टिस्ट स्वाती यशोदास राखोंडे यांनी या शोचे आयोजन केलेले आहे. शोमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय २४ आर्टीस्ट सहभागी झालेले आहेत. सहभागी आर्टीस्ट यांना संस्थेकडून कलासन्मान हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वेगवेळ्या शैलीमध्ये आर्टिस्ट यांनी आपली कला या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केलेली आहे. सहभागी आर्टिस्ट :–स्वाती यशोदास राखोंडे (आयोजक) पंकज पराशर, सचिन खरात, निमिषा भन्साली, जगदीश चंद्रा, मुख्तार एहमद सरदार, विशाखा शेठ ठक्कर, प्राजक्ता जोशी, अलिफया दारुवाला, डॉ. वैशाली दास, रुची अरोरा, स्वपन बाला, दिव्या चतुर्वेदी, मेघना पटेल, पूनम आनंद, बाळकृष्ण कांबळे, जितेंद्र चौधरी, सुजित जाधव, स्मृती चिंचनकर, नम्रता मेहता, मेहफूजा बरोदावाला, पल्लवी होटकर, दीपाली संपत. प्रदर्शन यशस्वीपणे होण्यासाठी अध्यक्ष निवृत्ती राखोंडे, आर्टिस्ट जितेंद्र सुरळकर, धनराज राखोंडे, पूनम चौधरी, फोरम शेठ,धीरज चौधरी यांचे सहकार्य लाभलेले आहे.तरी या सोहळ्यासाठी आपण सर्व कला प्रेमींनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन राखोंडे गुरुजी व आर्टिस्ट स्वाती राखोंडे यांनी केले आहे.